Sun, May 28, 2023

मराठी भाषा दिनानिमित्त साहित्य अभिवचन
मराठी भाषा दिनानिमित्त साहित्य अभिवचन
Published on : 28 February 2023, 11:40 am
डोंबिवली, ता. २८ (बातमीदार) : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाने ‘मराठी साहित्यातील ज्ञानपीठ’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शीतल दिवेकर, रेश्मा मराठे आणि चिराग गरुड या कलाकारांनी कविवर्य कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्या विविध साहित्याचे अभिवाचन केले. कविवर्य कुसुमाग्रजांचे आणि इतर साहित्यिकांचे मराठी भाषा वृद्धिंगत करण्यात मोलाचे योगदान आहे. त्यासाठी त्यांचे साहित्य सर्वांपर्यंत या अभिवाचनाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी केले. या कार्यक्रमास डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा आणि सहसचिव सतीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.