कर्करोगाची दुर्मिळ गाठीवर शस्त्रक्रिया

कर्करोगाची दुर्मिळ गाठीवर शस्त्रक्रिया

मुंबई, ता. २८ : कमरेच्या डाव्या भागात कर्करोगाची दुर्मिळ गाठ असलेल्या मुंबईतील एका १३ वर्षीय मुलावर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. एका खासगी रुग्णालयात सीटी स्कॅनच्‍या मदतीने ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्याने रुग्णाला जीवदान मिळाले.

घाटकोपर येथील आयुष शिंगोटे याला अचानक डाव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू होते; पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता डाव्या पायातील मांडीत कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करून ही गाठ काढणे गरजेचे होते. त्यानुसार रुग्णाला स्पायनल ॲनेस्थेशिया देण्यात आला आणि सीटीस्कॅनद्वारे मिनिमल इन्वेसिव्ह प्रक्रिया करून कर्करोगाची गाठ मुळासकट काढून टाकण्यात आली. या रुग्णामध्ये ऑस्टियोईड ऑस्टियोमा नावाचा ट्यूमर होता. यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. मुलाचे वय खूप कमी असल्याने सीटीस्कॅनद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीमुळे पुन्हा गाठ होण्याची शक्यता फार कमी असते, अशी माहिती हिप आणि गुडघा विशेषज्ञ सर्जन डॉ. श्रीसनत राव यांनी दिली. हिप आणि गुडघा विशेषज्ञ सर्जन डॉ. श्रीसनत राव, पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक डॉ. चिंतन दोशी, रेडिओलॉजिस्ट डॉ. शिल्पा जोशी, भूलतज्ज्ञ डॉ. वैशाली शेंडे यांनी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
----
मुलाच्या डाव्या पायात अचानक वेदना जाणवू लागल्या. वैद्यकीय चाचणीत डाव्या पायातील हाडांच्या खाली एक गाठ असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेमुळे मुलाची असह्य वेदनेतून सुटका झाल्याचा आनंद आहे.
- स्वाती शिंगोटे, रुग्णाची आई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com