धारावीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई
धारावीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

धारावीत अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

sakal_logo
By

धारावी, ता. २८ (बातमीदार) : धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील विविध दुकाने, उपाहारगृहे यांच्यासमोरील पदपथावर व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्‍यानंतर पालिकेने अखेर त्‍यांच्‍यावर कारवाई केली आहे.
पालिकेच्या ग, उत्तर विभागाने धारावीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. धारावीत अनेक रस्त्यांवर दुकानासमोरील जागा बळकावून अनधिकृत शेड उभारून, बांधकाम करून जागा गिळंकृत करण्याचे कृत्य वाढीस लागले आहे. यामुळे पादचाऱ्यांना व स्थानिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने ९० फुटी रस्त्यावर अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळेस दुकानदारांनी संघटितपणे त्यास विरोध केल्याने पालिकेस कारवाई आटोपती घ्यावी लागली होती. मात्र या वेळी पालिकेने नियोजन करून पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. ही कारवाई पालिकेच्या ग/ उत्तर विभागाचे मनपा सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या उपस्थितीत कडेकोट बंदोबस्तात करण्यात आली. यामुळे कारवाईत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. झालेल्या कारवाईमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, काहीच बांधकामावर कारवाई करून यावर नियंत्रण मिळवता येणार नाही. यामुळे सरसकट कारवाई केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.