कळव्यात ‘पुस्तकांच्या घरा’चा वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात ‘पुस्तकांच्या घरा’चा वर्धापनदिन
कळव्यात ‘पुस्तकांच्या घरा’चा वर्धापनदिन

कळव्यात ‘पुस्तकांच्या घरा’चा वर्धापनदिन

sakal_logo
By

कळवा, ता. २८ (बातमीदार) : कळव्यातील मनीषानगर येथे माजी नगरसेविका अपर्णा साळवी व माजी नगरसेवक मिलिंद साळवी यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आलेल्या ‘पुस्तकांच्या घरा’चा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मराठी राज्यभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पार पाडलेल्या या कार्यक्रमामध्ये पुस्तक दिंडी काढण्यात आली. मनीषा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व विभागातील अनेक वाचनप्रेमी नागरिक या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या वेळी मिलिंद बल्लाल, विख्यात पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण आणि मेधाताई सोमण उपस्थित होते.