Tue, March 28, 2023

होली क्रॉस हायस्कूलमध्ये ग्रंथ दिंडी
होली क्रॉस हायस्कूलमध्ये ग्रंथ दिंडी
Published on : 28 February 2023, 12:28 pm
वसई, ता. २८ (बातमीदार) : वसईच्या निर्मळ येथील होली क्रॉस शाळेत मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी मायबोली मराठीची महती सांगणारे अनेक साहित्यप्रकार सादर केले. नामवंत साहित्यिकांच्या कविता सुरेल आवाजात शालेय गायन मंडळांनी सादर केल्या. प्राचार्य फादर मायकल तुस्कानो, कार्यक्रमाचे अध्यक्ष सिरीयल मॅनेजिस तसेच उपप्राचार्य जॉन रुमाव यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी जीवन विकास मंडळ चेतना ग्रंथालय, वाचनालयापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक ग्रंथालयातून वाचनासाठी घेतले.