पंजाबमध्ये घुमला माऊलीचा गजर

पंजाबमध्ये घुमला माऊलीचा गजर

विरार, ता. २८ (बातमीदार) : संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेतर्फे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा सुरू आहे. भजन-कीर्तन, स्वामी गोविंद गिरी महाराजांची प्रवचनांमुळे सोहळ्याची रंगत उत्तरोत्तर वाढत आहे. भजन, कीर्तन, प्रवचने याबरोबरच नाटकांद्वारेही आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे करावा असा संकल्प करुन त्यासाठी महाराजांनी नाट्यमंडळाची निर्मितीकरुन विविध भागात हा उपक्रम सुरू केला आहे. सदानंद महाराज यांनी लिहिलेल्या ‘माऊली’ नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या नाट्यप्रयोगास संत नामदेव महाराज गुरुद्वारा संस्थेचे अध्यक्ष बाबा तारसेनसिंह, जनरल सेक्रेटरी सुखसिंदर सिंग लाली, उपाध्यक्ष तथा घोमानचे सरपंच बाबा नरेंदर सिंग, मनजीतसिंग हॅप्पी आदी मान्यवर उपस्थित होते.


---------------------
नाटकातील दृश्ये पारणे फेडणारी
संत नामदेव महाराज गुरुद्वारा सभागृह पंजाब-घोमान येथे बालयोगी यांनी लिहिलेल्या ‘माऊली’ या हिंदी भाषेत अनुवादित नाटकाचा प्रयोग सादर झाला. या नाटकात साकारलेली अनेक दृश्ये खूप हृदयस्पर्शी व डोळ्यांची पारणे फेडणारी होती. नाटकात संत ज्ञानेश्वर-राज राणे, निवृत्ती महाराज-कुमार भोईर, विठ्ठल पंत व नामदेव महाराज-नंदकुमार म्हात्रे, रूक्मिणी-स्मिता पाटील, मुक्ताई-मिनल भोईर आदी कलाकारांनी अविस्मरणीय भुमिका साकारली. मनोज राऊत निर्माता असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन पिळगावकर, नेपथ्य घनश्याम पाटील तर पार्श्वसंगीत दादा परसनाईक यांनी दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com