एसटीत ७५ इलेक्ट्रिक बस दाखल होणार

एसटीत ७५ इलेक्ट्रिक बस दाखल होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : इलेक्ट्रिक बस धोरणांतर्गत एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी केल्या जाणार असून, त्यापैकी ७५ बस सुरुवातीला ताफ्यात दाखल होतील. यातही ५० बस मुंबई-पुणे द्रुतगतीवर, इतर शिवाई बस पुणे ते कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर मार्गावर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवनेरीच्या तुलनेत भविष्यात शिवाईच्या इलेक्ट्रिक बसद्वारे स्वस्त प्रवास शक्य होणार आहे.

पुणे-नगर मार्गावर सध्या दोन इलेक्ट्रिक बस धावत असून, त्यांचे भाडे निमआराम बसच्या भाडे दराएवढेच आहे; तर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीचे सध्याचे भाडे ५२५ रुपये आहे. निमआराम बसचे भाडे ३५० रुपये आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर भविष्यात धावणाऱ्या इलेक्ट्रिक शिवाई बसचे भाडेसुद्धा निमआराम बसच्या तुलनेत स्वस्त होण्याची शक्यता आहे.

चार्जिंग स्टेशनचे आठवण
मुंबई-पुणे महामार्गासह इतरही मार्गावर ई-चार्जिंगची सोय केली जाणार आहे. २०२४ मध्ये दुसऱ्या टप्प्यात एसटीच्या ताफ्यात एकूण सुमारे ५००० इलेक्ट्रिक बस विकत घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात एसटी प्रशासनासमोर शिवाई इलेक्ट्रिक बस धावणाऱ्या महामार्गावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे आव्हान असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com