सहायक आयुक्त मारहाणप्रकरणी चौघांना जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्त मारहाणप्रकरणी चौघांना जामीन
सहायक आयुक्त मारहाणप्रकरणी चौघांना जामीन

सहायक आयुक्त मारहाणप्रकरणी चौघांना जामीन

sakal_logo
By

ठाणे, ता. २८ (वार्ताहर) : महापालिका सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी (ता. २८) रोजी ठाणे न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या सात कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांना त्याच दिवशी रात्री अटक करण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारीला तीन दिवसांची कोठडी आणि २० फेब्रुवारीला चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांनी न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. ठाणे न्यायालयाने या चारही आरोपींचा जामीन मंजूर केला.