Tue, March 28, 2023

जनसंघ संघटनेच्या आंदोलनाची अफवा
जनसंघ संघटनेच्या आंदोलनाची अफवा
Published on : 28 February 2023, 3:24 am
मुंबई, ता. २८ : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने प्रलंबित १६ मागण्यांसाठी आंदोलन केले होते. यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जनसंघ संघटनेच्या वतीनेही उद्या (ता. १) आंदोलन करण्यात येणार असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल झाल्या होत्या; मात्र असे कोणतेही आंदोलन नसल्याचे स्पष्टीकरण अॅड. सदावर्ते यांनी दिले आहे.