मुरबे आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा : निकम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबे आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा : निकम
मुरबे आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा : निकम

मुरबे आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा : निकम

sakal_logo
By

पालघर, ता. २८ (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मुरबे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी मंगळवारी मुरबे येथे भेट घेऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद शाळेची जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निश्चित करण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य करिष्मा उमतोल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र मेहेर, सरपंच मोनाली तरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. २० हजार लोकसंख्या असलेल्या मुरबे गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय पर्याय नाही. येथे सरासरी दर दिवशी ८० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र हे मच्छीमार सोसायटीमध्ये चालवले जात होते. पण काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार सुरू आहे. मुरबे येथे सीआरझेडची समस्या असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जागा मिळत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र अध्यक्षांनी सर्व तांत्रिक बाबींची पाहणी करून करून जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. तसेच याबाबत ग्रामपंचायतचा ठराव घेऊन तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरात लवकर काम सुरू करावे, असे आदेश अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले आहेत.