
तीन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार
मुंबई, ता. २८ : भायखळा परिसरात ४२ वर्षीय शेजाऱ्याने तीन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी परिसरातील संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
मोहम्मद हातीब मोहंमद यासीन खान असून तो विणकाम करणारा आहे. रविवारी (ता. २६) हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलींना ४२ वर्षीय शेजाऱ्याने नूडल्स खाऊ घालतो सांगून घरी बोलवले आणि तिन्ही मुलींचे शारीरिक शोषण केले. त्यानंतर या मुलींनी तातडीने घरातून पळ काढला. त्यानंतर तिघींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला. पीडित मुलींच्या आईने सर जे. जे. मार्ग पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दिली. सोमवारी (ता. २७) रात्री तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. या आरोपीला अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे.