हिमालया पुलाचे काम १० दिवसांत पूर्ण होणार

हिमालया पुलाचे काम १० दिवसांत पूर्ण होणार

हिमालय पुलाचे काम
१० दिवसांत पूर्ण
१ एप्रिलपर्यंत प्रवाशांच्या सेवेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक परिसरातील हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे महिनाभरात तो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुलाशी संबंधित अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आली आहेत. त्यानंतर चाचणी अहवाल आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १ एप्रिलपर्यंत तो सुरू केला जाणार आहे.
पुलाचे स्टेअर केच रेलिंग आणि रंगरंगोटीचे काम आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल. हिमालय पूल १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. दुर्घटनेनंतर पूल पूर्णपणे पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. दीड वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. नवीन आराखड्यानुसार हिमालय पूल टिकाऊ स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात आला आहे. ओरिसावरून आणण्यात आलेले पाच गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्टेअर केच रेलिंग आणि रंगाचे काम लवकरच केले जाणार आहे. त्यानंतर चाचणी अहवाल आणि इतर परवानग्यांची प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर १ एप्रिलपर्यंत पूल सुरू केला जाईल. त्यामुळे मुंबईकरांना अजून महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुलासाठी सरकता जिनाही बसविला जाणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दिव्यांगांना सोयीचे होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी रुपये खर्च येणार आहे. पुलाची लांबी ३३ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com