Sun, June 4, 2023

कांदिवलीत स्लॅब कोसळल्याने तीन जखमी
कांदिवलीत स्लॅब कोसळल्याने तीन जखमी
Published on : 28 February 2023, 4:03 am
कांदिवली, ता. २८ (बातमीदार) ः सातव्या मजल्यावरील घराचे स्लॅब सहाव्या मजल्यावरील घरात कोसळल्याने दोन महिला आणि एक पुरूष असे तिघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. हेतल दत्तानी, कुंजल शहा आणि पिंकल देऊ असे जखमींची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे शहा यांनी शनिवारीच या घरात गृहप्रवेश केला होता आणि अवघ्या दोन दिवसांतच स्लॅब कोसळला. सहायक आयुक्त ललित तळेकर यांनीही घटनास्थळी भेट देत ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.