स्कायवॉकवर अंधाराचे साम्राज्य

स्कायवॉकवर अंधाराचे साम्राज्य

घणसोली, ता. १ (बातमीदार)ः कोपरखैरणे रेल्वे स्थानकाहून ठाणे-बेलापूर रोडच्या दिशेने नागरिकांच्या सुविधेसाठी नवी मुंबई महापालिकेने स्कायवॉकची उभारणी केली आहे. मात्र. या स्कायवॉकवर विद्युत दिव्यांची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्थानक हे नवी मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या रेल्वे स्थानकातील एक मानले जाते. हजारो संख्येने पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रवासी प्रवासी या ठिकाणाहून मुंबई आणि पनवेल, वाशीच्या दिशेने ये-जा करतात. कोपरखैरणे पूर्वेकडे ठाणे बेलापूर रोड असल्याने या रोडवरून प्रवाशांना ये-जा करण्याची वेळ येऊन नये, यासाठी महापालिकेने पूर्वेकडील प्रवाशांसाठी स्कायवॉक उभारला आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या स्कायवॉकवर विजेची सुविधा उपलब्ध नसल्याने संपूर्ण अंधार पसरलेला आहे. त्यामुळे काहीतरी अघटित घडण्याची शक्यता या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या तरुण मुली-महिलांकडून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधित विभागाला यासंदर्भात कळवण्यात येईल, असे मोघम उत्तर देण्यात आले आहे.
----------------------------------------------
चोरीमारीच्या घटनांची भीती
कोट्यवधीचा खर्च करून उभारलेल्या स्कायवॉकवर उजेड नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरीमारीच्या घटना शकतात. शिवाय रात्रीच्या अंधारात महिलादेखील या स्कायवॅाकवरून प्रवास करत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिकेने किमान दिव्यांची सुविधा उपलब्ध करून प्रवाशांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी होत आहे.
----------------------------------------------
कोपरखैरणे रेल्वे स्थानकातून ठाणे-बेलापूर रोडवर असलेल्या स्कायवॉकवरून प्रवास करणे भीतीदायक झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे अनेक महिला टाळतात.
- मोनिका साठे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com