बंद कारमधून एक लाखांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद कारमधून एक लाखांची चोरी
बंद कारमधून एक लाखांची चोरी

बंद कारमधून एक लाखांची चोरी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : एपीएमसीतील वारणा सर्कल येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडून त्यातील १ लाख २८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून एपीएमसी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जोगेश्वरी येथे राहणारे हॉटेल व्यावसायिक अब्दुल रेहमान मोहम्मद हनीफ सेलीया (६२) यांचे सानपाडा येथील वारणा सर्कलजवळ हॉटेल आहे. सध्या त्यांच्या हॉटेलचे काम सुरू असल्याने शनिवारी (ता.२५) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अब्दुल रेहमान कारने सानपाडा येथे आले होते. यावेळी त्यांनी १ लाख २८ हजारांची रोख रक्कम असलेली बॅग कारमध्येच ठेवली होती. त्यानंतर त्यांनी वारणा सर्कलच्या बाजूला असलेल्या हॉटेलसमोर गाडी उभी केली होती. याचदरम्यान एका चौकडीने अब्दुल रेहमान यांच्या कारचा दरवाजा उघडून कारमध्ये असलेली १ लाख २८ हजारांची रोख रक्कम चोरली होती.
----------------------------
सीसी टीव्हीत चोरीचा प्रकार कैद
अब्दुल रेहमान कारजवळ आले असता त्यांना कारमधील पैसे असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ समोरील हॉटेलमध्ये असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता एका चोरट्याने त्यांच्या कारचा दरवाजा उघडल्याचे व त्यांच्या मदतीसाठी आजूबाजूला त्याचे इतर तीन सहकारी उभे असल्याचे निदर्शनास आले.