
विक्रमगड हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ
विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : विक्रमगड हायस्कूल येथे दहावीतील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे प्राचार्य अजित घोलप, तर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओंदेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनीपैकी काही जणींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जनार्दन पाथरवट, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष समीर आळशी, पर्यवेक्षक सु. ल. पाटील आदी उपस्थित होते. तसेच प्राध्यापक डॉ. योगेश पाटील, जनार्दन पाथरवट, घोलप, सु. ल. पाटील आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांपैकी विशाखा चौधरी, सारंगी भावर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.