अमर कोर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमर कोर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
अमर कोर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

अमर कोर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

sakal_logo
By

भांडुप, ता. २ (बातमीदार) ः अमर कोर विद्यालयात संचालक मारुती म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मराठी भाषा दिन उत्साहाने साजारा करण्यात आला. मराठी भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मराठमोळ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठी शब्दकोशांचे पूजन केले. भाषासमृद्धीची प्रातिज्ञा घेण्यात आली. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्‍यानंतर विडंबन काव्य, म्हणी, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, भारूड, गोंधळ, नाट्य, वासुदेवाची गाणी सादर करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण साधन अधिकारी बबिता सपकाळ, सेक्रेटरी जीवन म्हात्रे, सत्यवान गावकर, मुख्याध्यापक साईनाथ हांडे, अजय पवार तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.