Fri, June 9, 2023

सूर्योदय सोसायटीचे शर्तभंग नियमित करण्यास मुदतवाढ
सूर्योदय सोसायटीचे शर्तभंग नियमित करण्यास मुदतवाढ
Published on : 1 March 2023, 9:45 am
अंबरनाथ, ता. १ (बातमीदार) : अंबरनाथ येथील सूर्योदय सोसायटीतील अटी-शर्तीं भंग केलेल्या शासकीय जमिनी असलेल्या भोगवटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला अखेर महसूल विभागाने मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नुकतीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. याप्रकरणी वस्तुस्थिती सांगितल्यानंतर गेले वर्षभर बंद असलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्यांना महसूल विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे विलंब होत आहे. आर्थिक व्यवहार होत नाहीत तोपर्यंत फाईल पुढे सरकत नाही, असा आरोप अनेक वेळा रहिवाशांनी केला आहे.