Sun, May 28, 2023

मराठी भाषा दिनानिमित्त स्वरतरंग
मराठी भाषा दिनानिमित्त स्वरतरंग
Published on : 1 March 2023, 10:32 am
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः भाजप आणि सुमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन मुलुंड पूर्वेतील मराठा मंडळ सभागृहामध्ये नुकतेच करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजप गटनेते आणि माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी ‘स्वरतरंग’ हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. विशेष म्हणजे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांचा सत्कारदेखील या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार, खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहीर कोटेचा हे उपस्थित होते. या वेळी मराठा मंडळाचे रमेश शिर्के, योगगुरू कृष्णाजी कोर्टी आदींचा सत्कार करण्यात आला.