किल्ले मलंग नगरात रविवारी जागरण सभा

किल्ले मलंग नगरात रविवारी जागरण सभा

कल्याण, ता. १ (बातमीदार) : गेल्या कित्येक वर्षांपासून श्री मलंगगड आंदोलन सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना सकल हिंदू समाजाकडून श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी पाडा येथील क्रीडांगणावर रविवारी (ता. ५) भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मलंग जागरण धर्मसभेला अनंत श्री जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज, श्री राम युवा सेनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर, संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे, महेंद्र वेदक आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. या सभेसाठी सकल हिंदू समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com