Wed, June 7, 2023

इंग्रजी शाळेत मराठीचा जागर
इंग्रजी शाळेत मराठीचा जागर
Published on : 1 March 2023, 9:39 am
डोंबिवली, ता. १ (बातमीदार) : डोंबिवली पश्चिम येथील डॉन बॉस्को शाळेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तपस्या नेवे तसेच सुवर्णलता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. पालखीमध्ये मराठी भाषेतील पुस्तके, त्याचबरोबर ढोल-ताशे, लेझीमच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमांमध्ये स्वागतगीत, पोवाडा, महाराष्ट्र गीत तसेच साहित्याचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक उमेश सोनवणे, मुख्याध्यापिका स्मिता खराडे तसेच मराठी विषय शिक्षिका वैशाली महाजन व इतर शिक्षक उपस्थित होते.