लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू
लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू

लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू

sakal_logo
By

कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करीत सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी आणि मालकी हक्काचे घर व इतर प्रश्न सोडवले गेले आहेत. याबद्दल आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी मंगळवारी (ता. २८) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले. या वेळी मयूर देवळेकर, योजना ठोकळे, अनिल कांबळे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
राज्यातील सफाई कामगारांना लाड पांडे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने हा निर्णय जारी केला. या ऐतिहासिक निर्णयामुळे सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांना नोकरीत प्राधान्य व इतर सोयी-सुविधा मिळण्याचा मार्ग सुखकर होईल. या सर्व मागण्यांसाठी आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वात संघर्ष करीत असलेल्या सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला हे मोठे यश मिळाले आहे, असे विजय पवार यांनी सांगितले.
सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने यश मिळाले आहे. यात कामगारांचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना भाई गिरकर यांनी व्यक्त करून कामगारांचे आभार मानले.