वेती, वरोतीत जल योजनेचे काम युद्धपातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेती, वरोतीत जल योजनेचे काम युद्धपातळीवर
वेती, वरोतीत जल योजनेचे काम युद्धपातळीवर

वेती, वरोतीत जल योजनेचे काम युद्धपातळीवर

sakal_logo
By

कासा, ता. १ (बातमीदार) : सध्या डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तालुक्यातील वेती वरोती ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये घरोघरी पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून सध्या सूर्या नदीकिनारी वरोती व वेती गावासाठी विहिरी खोदून बांधकाम सुरू आहे. सूर्यानगरसाठीदेखील ही जलजीवन मिशन योजना राबवली जाणार आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत वेती, वरोती व सूर्यानगर तिन्ही गावासाठी प्रत्येकी एक कोटी म्हणजे तीन कोटीची कामे सुरू आहेत. या योजनेमुळे नागरिकांना प्रथमच घरोघरी पाणी मिळणार आहे. अनेक कुटुंबाना यामुळे फायदा होणार आहे. सूर्या प्रकल्पामधून असणाऱ्या धामणी धरणातून वसई-विरार, मिरा-भाईंदर, बोईसर आदी भागांत पाणी पुरवले जाते. आता मोठ्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथील पाणी इतर शहरांना पुरवले जाते. आता या गावांमध्येसुद्धा जलजीवन मिशनमुळे पाणी मिळणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.