होळीपूर्वी शेतकऱ्यांना खूशखबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळीपूर्वी शेतकऱ्यांना खूशखबर
होळीपूर्वी शेतकऱ्यांना खूशखबर

होळीपूर्वी शेतकऱ्यांना खूशखबर

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर) : होळीपूर्वी केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता सोमवारी (ता. २७) वितरित केला.
केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी-योजना ४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पनवेल तालुक्यामध्ये एकूण पात्र ९ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी १८ लाख रुपये रक्कम जमा झाल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, देशभरातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. योजनेनुसार पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांची गणना शेतकरी कुटुंबात केली जाते. यात २ हजार रुपये थेट शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याच अनुषंगाने होळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी जमा केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.