Wed, May 31, 2023

श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत मराठी भाषा दिन
श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत मराठी भाषा दिन
Published on : 1 March 2023, 10:02 am
वसई, ता. १ (बातमीदार) : वसई पूर्वेकडील गोखिवरे शैक्षणिक संस्था संचालित, श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘रुजवू मराठी भाषा, खुलवू मराठी भाषा आणि जगवू मराठी भाषा’ असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त आपले विचार मांडले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
----------
वसई : श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत उपस्थित विद्यार्थी.