Sat, June 3, 2023

स्वयंरोजगारासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण
स्वयंरोजगारासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण
Published on : 1 March 2023, 11:33 am
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच स्वयंरोजगारासाठी पालिका विविध उपक्रम घेत त्यांना प्रोत्साहन देते. पालिकेच्या एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच एन वार्ड पालिकेत पार पडले. अस्मिता निर्भवणे यांनी बॅग व परफ्यूम याचे प्रशिक्षण महिलांना दिले. या शिबिराला समाज विकास अधिकारी सरला राठोड, रोटरी क्लबचे सुनील पुराणिक, भावना अन्सारी, इनरव्हील क्लब मुंबई घाटकोपरचे अध्यक्ष शेफाली दोशी, कल्पना वसा, आदी उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.