मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून ४,८०० रुग्णांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून ४,८०० रुग्णांना मदत
मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून ४,८०० रुग्णांना मदत

मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून ४,८०० रुग्णांना मदत

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आठ महिन्यांत ४ हजार ८०० रुग्णांना एकूण ३८ कोटी ६० लाख रुपयांची मदत दिली आहे. जुलै २०२२ मध्ये १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख; तर फेब्रुवारी २०२३ मध्ये विक्रमी १० कोटी २७ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून देण्यात आली. राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्ण पैशांअभावी उपचाराविना राहणार नाहीत, याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो, असे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.