कशेडी घाटात कार दरीत कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेडी घाटात कार दरीत कोसळली
कशेडी घाटात कार दरीत कोसळली

कशेडी घाटात कार दरीत कोसळली

sakal_logo
By

पोलादपूर, ता. १ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघाताचे सातत्य कायम असून एक चारचाकी दरीत कोसळ्याची घटना घडली. या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. संदीप चंद्रकांत सावंत (रा. आंबोली, ता. संगमेश्वर) हे आपल्या कुटुंबीयांसोबत जात असताना कशेडी घाटात वळणावर वाहनावरील त्याचा ताबा सुटल्याने त्यांची चारचाकी रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या दरीत जाऊन उलटली. यात संदीप यांचे वडील चंद्रकांत धोंडू सावंत यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झालेली असून सुवर्णा चंद्रकांत सावंत यांच्या तोंडाला आणि पायाला किरकोळ मार लागला आहे. या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सहायक पोलिस निरीक्षक अनिल चांदणे, सहायक पोलिस निरीक्षक सुर्वे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बचाव पथकाच्या मदतीने जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.