उलवेमध्ये बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उलवेमध्ये बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा
उलवेमध्ये बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

उलवेमध्ये बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग व स्वमन स्पेशल ह्युमन राईटस कौन्सिल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ११) सकाळी १० ते ४ या वेळेत उलवे सेक्टर-१९ येथील बामणडोंगरी रेल्वेस्थानकाजवळील शगुन बॅंक्वेट हॉलमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती उपआयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकतांनी दिली.
रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या दहावी पास/नापास, बारावी, आयटीआय, पदवी, पदविका, पदवीधर, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छूक‍ उमेदवारांनी https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर स्वतः चा बायोडाटा आणि शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई विभाग कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त शा. गि. पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.