मरेकडून १० होळी विशेष रेल्वे

मरेकडून १० होळी विशेष रेल्वे

मुंबई, ता. १ : होळीनिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल-छपरा दरम्यान आणखी १० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे क्रमांक ०२५९८ एसी होळी स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ आणि १२ मार्च २०२३ रोजी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०२५९७ एसी होळी स्पेशल गोरखपूरहून ३ आणि १० मार्च २०२३ रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला सकाळी ७.२५ वाजता पोहोचेल. तसेच रेल्वे क्रमांक ०५१९४ पनवेल-छपरा होळी स्पेशल ३ ते १७ मार्चपर्यंत दर शुक्रवारी रात्री १०.५० वाजता पनवेलहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता छपरा येथे पोहोचेल, तर रेल्वे क्रमांक ०५१९३ २ ते १६ मार्च २०२३ पर्यंत दर गुरुवारी दुपारी ३.२० वाजता छपरा येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पनवेलला पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com