विकास कामावरून विक्रमगडमध्ये राजकारण तापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास कामावरून विक्रमगडमध्ये राजकारण तापले
विकास कामावरून विक्रमगडमध्ये राजकारण तापले

विकास कामावरून विक्रमगडमध्ये राजकारण तापले

sakal_logo
By

पुरोहित...

----------

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : विक्रमगड शहरातील तीन कामांचे भूमिपूजन ऑगस्टमध्ये करण्यात आले होते; मात्र भूमिपूजनानंतर या कामांची सात महिने होऊनही सुरुवात का झाली नाही, असा प्रश्‍न भाजपचे शहर अध्यक्ष परेश रोडगे यांनी आमसभेत उपस्‍थित केल्याने मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
भाजपचे शहर अध्यक्ष परेश रोडगे यांनी आमसभेमध्ये भूमिपूजन झालेल्या कामाला अद्याप सुरुवात का झाली नाही, याबाबतचा मुद्दा उचलून धरला. शहरातील तीन कामाच्या प्रशासकीय मान्यता या मंत्रालयातून मिळाल्यानंतर कामाच्या कोनशिलेचे उद्‍घाटन करण्यात आले; मात्र या मान्यता तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आल्या. त्यामुळे काम सुरू झाले नसून येत्या १०-१५ दिवसांत या प्रशाकीय मान्यता मिळतील. सदर कामाला मंजुरी नसल्यामुळे व कामाचे कार्यारंभ आदेश रद्द झाल्याने काम सुरू होऊ शकले नाही, असे नगरपंचायत प्रशासनाने या वेळी स्पष्ट केले. यावर परेश रोडगे यांनी मागणी केली की, कार्यारंभ आदेश नसताना व निविदा प्रक्रिया झालेली नसताना तुम्ही लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून भूमिपूजन सोहळा केल्याने ही लोकप्रतिनिधींची फसवणूक आहे. त्यामुळे यावर कारवाईची मागणी भाजपचे शहरध्यक्ष परेश रोडगे यांनी केली.

दरम्यान विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊ संघटनेची एकहाती सत्ता असून शहरात जिजाऊ संघटना विरोधात सर्व पक्ष असे राजकारण नेहमी पाहावयास मिळत असते. मात्र या प्रकरणावरून पुन्हा जिजाऊ संघटना विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे जिजाऊ विरुद्ध सर्व विरोधक यांचा जोरदार कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

--
स्थानिक आमदार व खासदार यांना वर्क ऑर्डर नसल्याचे समजेल म्हणून स्थानिक आमदार, खासदार यांना भूमिपूजनाला बोलवण्यात आले नाही. सदर विषय गांभीर्याने घेऊन संबंधित मुख्याधिकारी व या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधींची फसवणूक करून दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून कायदेशीर कारवाई व्हावी.
- परेश रोडगे, शहरध्यक्ष भाजप, विक्रमगड
---
या कामाची या आधी मंत्रालयातून प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्या अनुषंगाने कामाच्या कोनशिलेचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर ही प्रशासकीय मान्यता रद्द झाली. त्यामुळे ही कामे करता आली नाहीत. या कामाची प्रशासकीय मान्यता पुन्हा रिवाईझ १०-१५ दिवसांत होऊ शकते.
- अजय साबळे, मुख्याधिकारी, विक्रमगड नगरपंचायत

-----
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून फक्त विकासकामे करून जनतेचा विकास साधण्याचे काम केले जात आहे. आमच्या कामात राजकारण करून अडथळा निर्माण केला, तरी आम्ही आमचे विकासाचे काम करीत राहाणार. लोकांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या संस्थेचे ध्येय आहे.
- नीलेश भगवान सांबरे, संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र