विदेशी बनावटीच्या मद्यासह ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदेशी बनावटीच्या मद्यासह ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त
विदेशी बनावटीच्या मद्यासह ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

विदेशी बनावटीच्या मद्यासह ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १ : परराज्यांतील मद्याच्या वाहतुकीसह विक्रीवर बंदी असताना, परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी खानवेल उधवा रोड येथे कारवाई केली आहे. या कारवाईत ४८ लाख ५६ हजारांचा परराज्यांतील विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला यश आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने दिली.

उधवा येथे परराज्यांतील बनावट दिव-दमण निर्मित मद्याचा साठा एका टेम्पोमधून जात असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाला मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनील चव्हाण, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी भरारी पथक निरीक्षक आनंदा कांबळे यांच्या पथकाने सापळा लावला होता. त्यानुसार उधवा पोलिस चौकीसमोर, खानवेल उधवा रोड पोलिस ठाण्याजवळ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेल्या व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असणारे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बियरचा साठा व टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे, नारायण जानकर, केतन वझे, वैभव वामन, हनुमंत गाढवे, संपत वणवे, नानासाहेब शिरसाठ यांनी पार पाडली.

---------
दोघांना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला या टेम्पोत विदेशी मद्याचे ३३० बॉक्स व बियरचे ७० बॉक्स आढळून आले असून या प्रकरणी वाहनचालक सुरेशकुमार दयाराम यादव व शैलेश मोहनभाई वर्मा (रा. उधवा, जि. वलसाड) यांना अटक करून मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा ४८ लाख ५६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.