कल्याणात डंपिंगला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणात डंपिंगला आग
कल्याणात डंपिंगला आग

कल्याणात डंपिंगला आग

sakal_logo
By

कल्याण, ता. १ (बातमीदार) : कल्याण पश्चिमेला असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीवर नऊ तासांनी सकाळी आठच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या डम्पिंग ग्राऊंडला दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, सोबतच राजकीय वातावरणही तापले आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आठवड्यात लागोपाठ लागलेल्या आगीच्या तीन घटनांमुळे पाहणी आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे संकेत पालिका अधिकाऱ्यांनी दिले.