विद्युत खांबावर कार धडकून एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत खांबावर कार धडकून एक ठार
विद्युत खांबावर कार धडकून एक ठार

विद्युत खांबावर कार धडकून एक ठार

sakal_logo
By

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रण सुटल्याने विद्युत खांबावर आदळली. या अपघातात एक जखमी झाला असून, अन्‍य एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. घोडबंदर रोडवर भरधाव वेगाने कार घेऊन दोघेजण ठाण्याकडे निघालेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कार सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूलजवळ चालक पदम मेघांनी रा. मुलुंड, मुंबई याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युत खांबाला धडकली. यात कारचे मोठे नुकसान झाले. कारमध्ये चालक पदम मेघांनी आणि त्याचा सहकारी सौमित्र धारा हे बराच वेळ अडकलेले होते. जखमी दोघांना रुग्णवाहिकेद्वारे उपचाराकरिता रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. डॉक्टरांनी कारचालक पदम मेघांनी याला मृत घोषित केले; तर सौमित्र धारा याला मुका मार लागला असल्याची माहिती दिली.