आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाद्वारे जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातील प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी प्रक्रिया १७ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महापालिकांमध्ये ६२९ पात्र शाळा असून एकूण १२ हजार २७८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर १ मार्च २०२३ दुपारी ३ ते १७ मार्च २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

--