घाटकोपर, विक्रोळी, भांडुपमध्ये उद्या पाणी नाही

घाटकोपर, विक्रोळी, भांडुपमध्ये उद्या पाणी नाही

घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये
उद्या पाणी नाही

मुंबई, ता. १ : मुंबईतील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एस आणि एन विभागात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपमधील काही परिसरांमध्ये २ मार्च रोजी मध्यरात्री १२ ते ३ मार्च मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
भांडुप पश्चिम क्वारी रोड परिसरात मागील वर्षभरात ९०० मिमी मुख्य जीआरपी जलवाहिनी वारंवार फुटल्यामुळे भांडुपकरांचे पाण्याविना प्रचंड हाल झाले होते. महापालिकेतर्फे २ मार्च रोजी पूर्व आता क्वारी रोड परिसरात १२०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी गुरुवार, २ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून शुक्रवार, ३ मार्च मध्यरात्री १२ वाजेपर्यंत एस आणि एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारी ठिकाणे
- भांडुप एस वॉर्ड ः प्रतापनगर, कोकणनगर, समर्थनगर, मुथू कम्पाऊंड, सोनापूर, लेक रोड, सुभाषनगर, गावदेवी मार्ग, भट्टीपाडा मार्ग, सर्वोदयनगर, जंगलमंगल मार्ग, जनता बाजार, ईश्वरनगर, टॅंक रोड राजदीपनगर, उषानगर, नरदास नगर, भांडुप व्हिलेज रस्ता आणि कांजूरमार्ग एल बी एस परिसर.
- विक्रोळी एन वार्ड ः विक्रोळी पश्चिम, रेल्‍वेस्थानक परिसर, लालबहादूर शास्त्री मार्ग, पार्क साईट, लोअर डेपो पाडा, सागरनगर व विक्रोळीमधील काही परिसर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com