विमातळावर ‘डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक’ सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमातळावर ‘डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक’ सुविधा
विमातळावर ‘डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक’ सुविधा

विमातळावर ‘डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक’ सुविधा

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाने ‘डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक’ (डीटीडी) नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे टर्मिनल दोनवरून देशांतर्गत उड्डाणे जोडणाऱ्या टर्मिनस एकवर विमान प्रवाशांना सहज जाता येणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

भारतातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक मुंबई विमातळ आहे. या विमानतळावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांचा प्रवास सोयीस्कर आणि त्रासमुक्त करण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ वरून टर्मिनल १ वर प्रवाशांना आता थेट जाता येणार आहे. त्यासाठी डोमेस्टिक-टू-डोमेस्टिक ही नवीन सुविधा सुरू केली आहे. यासाठी सुरक्षा तपासणीमधील जागा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या हस्तांतरणासाठी किमान कनेक्शन टाइम (एमसीटी) कमी होईल. ज्यामुळे प्रवाशांना ‘कनेक्टिंग फ्लाइट्स’ने सहज प्रवास करता येईल. तसेच प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.