उच्च शिक्षणात अपयशाने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उच्च शिक्षणात अपयशाने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
उच्च शिक्षणात अपयशाने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

उच्च शिक्षणात अपयशाने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : उच्चशिक्षणात वारंवार येणाऱ्या अपयशाने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. मंगळवारी रात्री राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अग्रसेन टॉवर येथील ५ व्या माळ्यावर राहणारा विबोध दत्ताराम जाधव हा तरुण आत्महत्या करत असल्याचे कळताच शेजाऱ्यांनी याची माहिती ठाणे नियंत्रण कक्षाला दिली. या वेळी रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा खोलून तरुणाच्या गळ्यातील दोरी कापून सुखरूप खाली उतरवले. त्याची विचारपूस केली असता तो उच्चशिक्षित असून सध्या तो डाटा सायन्सच शिक्षण घेत आहे. आपल्या शिक्षणात येत असलेल्या अपयशाच्या नैराश्यातून त्याने हे आत्महत्येच पाऊल उचलल्याचे विबोधने पोलिसांना सांगितले. विबोध याचे वडील देवराम जाधव हे सेवानिवृत्त असून त्याची आई स्मिता जाधव या इंडियन नेव्हीमध्ये सिनियर चार्जमन पदावर कार्यरत आहे. घटनेच्या वेळी विबोधची आई रात्रपाळीसाठी कामावर गेली होती; तर वडील हे सत्संगला गेले होते. त्याच वेळी विबोधने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.