Wed, June 7, 2023

जानेवारीत मुंबईतून साडेचार कोटीचे ड्रग्ज जप्त
जानेवारीत मुंबईतून साडेचार कोटीचे ड्रग्ज जप्त
Published on : 1 March 2023, 4:21 am
मुंबई, ता. १ : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी महिन्यात ४.४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत ९७ आरोपींना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या पाच पथकांनी मुंबई शहरात ठिकठिकाणी छापेमारी करत ही कामगिरी केली. या संदर्भात पोलिसांनी एकूण ७६ गुन्हे दाखल केले. पकडलेल्या मुद्देमालात २.८६ कोटी रुपयांचे १.६ किलो मेफेड्रिन, दीड कोटी रुपयांचे ३७१ ग्रॅम हेरॉई ड्रगसह ७६ किलो गांजाचा समावेश होता. या सर्व आरोपींवर अंमली पदार्थ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.