खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेचे सुयश

खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेचे सुयश

खर्डी, ता. २ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील जिल्‍हा परिषद ऊर्दू, नगरपालिका व खासगी शाळेच्या सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकतेची मानसिकता या विषयावर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्‍यात आली. खर्डीतील जिल्‍हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, खर्डी क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.
उल्हासनगर येथील डी. टी. कलानी या शाळेत ‘उद्योजकतेची मानसिकता’ या विषयावर झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील नऊ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन २७ प्रोजेक्ट सादर केले होते. यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं. १ च्या विद्यार्थ्यांनी ‘अंधांसाठी डिलीट चष्मा’ बनवून प्रथम क्रमांक मिळवला; तर ‘उटण्याचे साबण व धूप’ या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाल्याने त्यांची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. हे प्रोजेक्ट बनवण्यात सहभागी झालेल्या चरण बिन्नर, लव परदेशी, जयेश दुभेले, ऋतुजा सापळे, वैष्णवी घरत, भावेश धसाडे या विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक सुधीर भोईर व शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. जिल्हास्तरीय इंग्रजी कविता वाचन स्पर्धेत इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आलिया कासीम मोमिन हिची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com