कल्याणमध्‍ये ठाकरे गटाच्या वतीने स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्‍ये ठाकरे गटाच्या वतीने स्वच्छता मोहीम
कल्याणमध्‍ये ठाकरे गटाच्या वतीने स्वच्छता मोहीम

कल्याणमध्‍ये ठाकरे गटाच्या वतीने स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

कल्याण, ता. ७ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विद्यमाने कल्याण पूर्वेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी वर्गाने सहभाग घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण पूर्व शहरप्रमुख शरद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कल्याण पूर्वमधील काटेमानिवली चौकातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. कल्याण पूर्वमधील मुख्य बाजारपेठ, जुनी जनता सहकारी बँक, गणेश चौक, रमाई चौक, म्हसोबा चौक, तिसगाव शिवसेना शाखा ते तिसगाव नाका या यू टाईप रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत शहरप्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, राधिका गुप्ते, मिना माळवे, पुरुषोत्तम चव्हाण आदी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.