कल्याण मटका अड्ड्यावर छापा

कल्याण मटका अड्ड्यावर छापा

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : उरणमधील चारफाटा येथील एचपी गॅस वितरण कार्यालयाच्या मागे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सोमवारी रात्री छापा मारला. या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उरणमधील चार फाटा येथील एचपी गॅस वितरण कार्यालयाच्या मागे असलेल्या सिडकोच्या मोकळ्या जागेतील एका झोपडीमध्ये काही व्यक्ती कल्याण, मेन व जनता या नावाचा मटका जुगार चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-२ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास जुगाराच्या अड्डयावर छापा मारला होता. या छाप्यात पोलिसांनी मटका खेळवणारे अनिल पाटील (४५) व सतीश पाटील (३९) या दोघांसह इस्माईल शेख (३४), वसंत पाटील (५९), सुनील कोळी (६१), नारायण महातो (३७), प्रभाकर बोंबले (५२), बाबुभाई शेख (५०), सुशांत भोईर (४८) आणि सतीश शिरधनकर (५१) यांना ताब्यात घेतले.
-----------------------------------------------
मटका चालवणारा फरारी
या कारवाईत पोलिसांनी मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच कल्याण, जनता आणि मेन हा मटका जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगार बुक, मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या व रोख रक्कम जप्त केली. ताब्यात घेण्यात आलेल्यांवर उरण पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असून मटका चालवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com