कचरावेचक महिलांना उन्नतीचा कानमंत्र

कचरावेचक महिलांना उन्नतीचा कानमंत्र

घणसोली, ता.२(बातमीदार)ः कचरावेचक महिलांना समाजाकडून नेहमीच उपेक्षित नजरेने बघितले जाते. त्यामुळे घरी अथवा सोसायटींमध्ये कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या महिलांना नेहमी दुय्यम वागणूक समाजाकडून दिली जाते. समाजाचा हाच दृष्टीकोन बदलण्यासाठी बुधवारी (ता.१) कचरावेचक दिनानिमित्त स्त्री मुक्ती संघटना, परिसर सखी विकास संस्था, नूतन को- ऑपरेटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरखैरणे येथे ‘निर्धार मेळावा’ घेण्यात आला.
या मेळाव्याला प्रमुख वक्ते श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सीएसआर एक्झिक्युटिव्ह/ बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड दिशिता देव, उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कचरा वेचक महिला उपस्थित होत्या. यावेळी कचरा वेचक महिलांनी विविध अडचणी मांडल्या. यात नवी मुंबईतील प्रत्येक विभागातील १५० हून अधिक कचरा वेचक महिला सहभागी झाल्या होत्या.
----------------------------------------
महिलांच्या विविध मागण्या
कचरा गोळा करताना सहभाग व सहकार्य लाभावे, सर्व कचरावेचकांना महापालिकेतून ओळखपत्र मिळावे, पर्यावरणपूरक कामात रोजगार उपलब्ध व्हावा, सर्व कचरा वेचकांना रेशनकार्ड व नियमित धान्य पुरवठा, मोफत, योग्य व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, मुलांना शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळावी, वयोवृद्ध व विधवा महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे. पेन्शन योजना सुरू करावी, डंपिंगवर कचरा वर्गीकरणात सामावून घ्यावे, कचऱ्यासाठी शेड उपलब्ध करून मिळावी.
-----------------------------------------------------
या कार्यक्रमात कचरा वेचक महिलांकडून मांडलेले मुद्दे बिस्लारीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उचलण्यात येणार आहेत. तसेच समाजाने देखील अशा महिलांबद्दल आदर बाळगणे गरजेचे आहे.
-दिशीता देव, बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड
----------------------------------
तुम्ही कचऱ्यात काम करत आहेत. तुमच्या मुलांनी करू नये, असा निर्धार करा. तसेच कचरावेचक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील नक्की प्रयत्न करू.
-जगदीश खैरालीया, सरचिटणीस, श्रमिक जनता संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com