भात विक्रीच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचित

भात विक्रीच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचित

वज्रेश्वरी, ता. २ (बातमीदार) : भात खरेदी केंद्रांवर जानेवारी महिन्यात विक्री केलेल्या भाताचा मोबदला शेतकऱ्यांना दोन महिन्यानंतरही मिळाला नसल्याने तालुक्यातील ६७ शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी दुगाड फाटा येथील भात खरेदी केंद्रावर जानेवारी महिन्यात आपल्या भाताची विक्री केलेली आहे.
हिवाळी सेवा सोसायटीच्या माध्यमातून हा भात खरेदी-विक्रीचा व्यवहार जानेवारी महिन्यात झालेला आहे; मात्र दोन महिने उलटल्यानंतरही ६७ शेतकऱ्यांची भाताच्या मोबदल्याची रक्कम थकलेली आहे. तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून एका शेतकऱ्यांचे किमान पन्नास हजाराहून अधिक देणे थकले आहे. त्यातच मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी सोसायटीचे काढलेल्या कर्जाच्या फेडीसाठीचा तगादा सोसायट्यांकडून लावला जात असून ऐन लग्नसराईत हातात हक्काचे पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

---------------------------
जानेवारी महिन्यात केलेल्या भातविक्रीचे हक्काचे पैसे शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून लवकरात लवकर देणी मिळाली नाही तर दुगाड फाटा भात खरेदी केंद्रावर शेतकरी आंदोलन करतील.
- शिवाजी राऊत, शेतकरी

------------------------
फेडरेशनकडून मागील शुक्रवारीच शेतकऱ्यांच्या पीएफएमएसमार्फत बँक खात्यावर पैसे पाठवले आहेत; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे बँकेत जमा झाले नाहीत. याबाबत आम्ही पीएफएमएस बँकेशी पत्रव्यवहार करणार आहोत.
- डी. एस. पवार, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com