Sun, June 4, 2023

खुशबू शेवानीचा छत्तीसगडमध्ये सन्मान
खुशबू शेवानीचा छत्तीसगडमध्ये सन्मान
Published on : 2 March 2023, 12:19 pm
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : मागील वर्षी कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मिसेस इंडिया ठरलेल्या उल्हासनगरातील खुशबू शेवानी यांचा छत्तीसगड रायपूरमध्ये सन्मान करण्यात आला. छत्तीसगड सिंधी अकादमीच्या शंकरनगर, शांतीनगर पूज्य सिंधी पंचायत आणि सिंधू संस्कार सेवा समितीच्या महिला विंगतर्फे नारायणी स्वरूप लोडी समारोह आयोजित करण्यात आला होता. रायपूरमधील सिंधू पॅलेस, शंकरनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मिसेस इंडिया खुशबू शेवानी यांच्यासह विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवणाऱ्या सिंधी महिलांना सन्मानित करण्यात आले.