व्हॉट्‍सअपवर महिलांना अश्‍लील मॅसेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॉट्‍सअपवर महिलांना अश्‍लील मॅसेज
व्हॉट्‍सअपवर महिलांना अश्‍लील मॅसेज

व्हॉट्‍सअपवर महिलांना अश्‍लील मॅसेज

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २ (बातमीदार) : कपडे इस्त्री करण्यासाठी आलेल्या महिलांचे मोबाईल क्रमांक घेऊन, त्या व्हॉट्‍सॲपवर अश्‍लील मॅसेज पाठवणाऱ्या संशयित आरोपीला विरार पोलिसांनी डोंबिवलीतून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला बुधवारी (ता. १) रात्री अटक करण्यात आली. त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.

डोंबिवली स्थानकाच्या पूर्व भागातील कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या दुकानात सोनू कनोजिया (वय ३५) हा काम करत होता. विरार पूर्व परिसरातील एका तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर त्याने मिसकॉल केला होता. त्यानंतर त्याने व्हॉट्‍सॲपवर अश्‍लील मॅसेज टाकण्यास सुरुवात केली. हा मॅसेज तिने वडिलांना दाखवला असता त्यांनाही त्याने अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून, मला कोणीही पकडू शकत नाही, अशा धमक्या दिल्या होत्या. याप्रकरणी तिच्या वडिलांनी विरार पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १) तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने संशयित आरोपीला डोंबिवलीतून अटक केली.

व्हॉट्‍सॲप क्रमांक शेअर करू नये
मूळ उत्तर प्रदेशातील असणारा हा आरोपी विवाहित असून त्याची पत्नी आणि मुले गावी असतात. इस्त्रीच्या दुकानात काम करून तिथेच राहत होता. या दुकानात इस्त्रीसाठी कपडे घेऊन येणाऱ्या महिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन तो अश्‍लील मॅसेज करत असल्याचे तपासात समोर आले. महिला, मुलींनी व्हॉट्‍सॲप क्रमांक अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.