Tue, March 28, 2023

‘अवैध नळजोडण्या नियमीत करा’
‘अवैध नळजोडण्या नियमीत करा’
Published on : 2 March 2023, 11:13 am
विरार, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात अवैधपणे घेतलेल्या अनधिकृत नळजोडण्या १५ मार्चपूर्वी नियमित करून न घेतल्यास नळजोडणी घेणाऱ्या व्यक्ती, संस्था, पदाधिकारी यांच्याविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिला आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत नळजोडण्यांबाबत संबंधित प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त व प्रभारी सहायक आयुक्तांकडे लेखी अर्ज करून नियमित करून घेता येणार आहेत. मात्र अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी मालमत्ता प्रकारानुसार अनुज्ञेय नळजोडणी आकाराच्या तिप्पट दराने नळजोडणी आकार वसूल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याबाबतची जाहीर नोटीस शहरात ठिकठिकाणी लावण्यात आली आहे.