मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्याविरोधात गुन्हा

मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्याविरोधात गुन्हा

कल्याण, ता. २ (बातमीदार) : ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांना शिव्यांची लाखोली वाहिली होती. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस उपायुक्तांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात राजुल पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने चांगलाच विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. कल्याणमध्ये गुरुवारी (ता. २) महावीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुंबईच्या महिला विभाग संघटक राजुल पटेल यांची चांगलीच जीभ घसरली. त्यांनी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना व्यासपीठावरून शिव्यांची लाखोली वाहिली होती. यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल होताच शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या. शिवसेना जिल्हा महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेत राजुल पटेल व कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पटेल यांच्याविरोधात आज सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

विरोधकांच्या पोटात दुखते
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची टीका वाघमारे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com