दहा शनिवारी-रविवारी ‘एल’ विभागात पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा शनिवारी-रविवारी 
‘एल’ विभागात पाणीपुरवठा बंद
दहा शनिवारी-रविवारी ‘एल’ विभागात पाणीपुरवठा बंद

दहा शनिवारी-रविवारी ‘एल’ विभागात पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

आजपासून प्रत्येक शनिवारी
‘एल’ विभागात पाणीपुरवठा बंद
जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेचा निर्णय
मुंबई, ता. २ ः पूर्व उपनगरातील ‘एल’ विभागातील खैरानी रोडखाली असलेल्या तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदिरदरम्यानच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या कामासाठी सलग १० दिवस लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने सलग १० शुक्रवार आणि शनिवारी काम करण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. परिणामी ४ मार्च ते ६ मेदरम्यानच्या कालावधीत प्रत्येक शनिवारी ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.
परिसरातील नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे. दर रविवारी येणारे पाणी गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
‘एल’ विभागातील खैरानी रोडखाली असलेल्या १२०० मिमी व्यासाच्या व ८०० मीटर लांबीच्या जलवाहिनीचे सक्षमीकरण तातडीने करणे आवश्यक झाले आहे. जलवाहिनीच्या अंतर्गत भागात ‘क्युअर्ड इन प्लेस्ड पाईप’ पद्धतीने मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सलग दहा दिवसांचा कालावधी आवश्यक आहे; मात्र सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने ते टप्प्याटप्प्यामध्ये १० दिवस करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठ्यावर परिणाम होणारी ठिकाणे
‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कम्पाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसूजा कम्पाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर आणि आझाद मार्केट परिसरात ४ मार्चपासून ६ मेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल. सलग १० शनिवार या भागात पाणी येणार नाही.