पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्षीदारांच्या गैरहजेरीने आरोपीची निर्दोष मुक्तता

पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्षीदारांच्या गैरहजेरीने आरोपीची निर्दोष मुक्तता

ठाणे, ता. २ (वार्ताहर) : पत्नीच्या हत्येच्या आरोपात सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत ठाणे अतिरिक्त न्यायालयाने ४५ वर्षीय आरोपीची निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपी गेल्या आठ वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असल्याचेही निकालात नमूद करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरात राहणाऱ्या अतुल रेबीनाथ बर्मन याने रात्रीच्या वेळी पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचा पोलिसांनी न्यायालयात दावा केला. हत्येप्रकरणी त्याला अटक केल्यापासून तो कारागृहात बंदिस्त होता. या खटल्यात पोलिसांनी साक्षीदार नोंदवले होते. त्यांना न्यायालयाने समन्स पाठवल्यानंतरही कुणीही साक्षीदार न्यायालयात साक्षीसाठी उपस्थित राहिले नाही. या प्रकरणात न्या. ए. एस. भागवत यांनी निकालात स्पष्ट केले, की आरोपीला संशयावरून अटक केली. त्यानंतर घटनेच्या दिवसापासून आजपर्यंत आरोपी हा न्यायालयीन कोठडीत बंदिस्त आहे; मात्र सरकारी पक्षाला एकही साक्षीदार न्यायालयात हजर करता आला नाही. त्यामुळे त्याला निर्दोष सोडण्याचा निकाल न्यायालयाने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com